ContentSproute

माती-मृदा-तपासणी

माती/मृदा तपासणी म्हणजे काय आणि मृदा तपासणीचा अहवाल कसा मिळतो ? (WHAT IS SOIL TESTING AND HOW DO I GET A SOIL TEST REPORT?)

शेती करताना मातीची सुपीकता आणि अन्नद्रव्यांची स्थिती स्थानिक शेतकऱ्यांना माहित असणे हे खूप महत्वाचे आहे.

हे कळण्यासाठी मृदा परीक्षण (Soil Testing) करावे लागते. यामुळे पीकासाठी योग्य खते, खतांचे प्रमाण आणि वेळ निश्चित करता येऊ शकतो.

मृदा परीक्षण (Soil Testing) म्हणजे काय?

मृदा परीक्षण म्हणजे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश, आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे हे तपासणे. याशिवाय मातीचा pH, सेंद्रिय कर्ब, क्षारता व मातीचा प्रकार याचीही माहिती मिळू शकते.

  1. मृदा तपासणीसाठी काय करावे?
  • मृदा तपासणी साठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे नमुने गोळा करावे.
  • शक्यतो शेतातील प्रातिनिधिक भागातून नमुना घ्या.
  • 15 ते 20 से.मी. खोली वरून ‘V’ आकाराचा खड्डा खणून त्यामधील माती घ्यावी.
  • एका शेतातून 5 ते 6 ठिकाणांहून माती घेऊन एकत्र करावी.
  • त्या मातीमधून दगड, कचरा व पालापाचोळा वेगळा करावा.
  • माती घरामध्ये किंवा सावलीत वाळवून, साफ कापडी पिशवीत भरावी.
  • त्या पिशवी वरती शेतकऱ्यांनी आपले नाव, गट क्रमांक, गाव, तालुका, पीक व तारीख नमूद करावी.

२. माती  तपासणीसाठी कुठे द्यायची ?

शासकीय केंद्रे:

  • कृषी विभागाचे मृदा परीक्षण प्रयोगशाळा
  • तालुका कृषी अधिकारी कार्यालये
  • कृषी विद्यापीठांची मृदा प्रयोगशाळा

खासगी प्रयोगशाळा:

सरकार मान्यताप्राप्त व NABL प्रमाणित प्रयोगशाळेमध्ये देखील शेतकरी आपल्या मातीचा नमुना देऊ शकतात .

३. फॉर्म भरणे शुल्क

नमुना दिल्यावर मृदा तपासणी फॉर्म भरावा लागतो.

काही ठिकाणी मोफत सेवा असते , तर काही ठिकाणी नाममात्र शुल्क साधारणतः ₹20–₹100 असू शकते.

काही ठिकाणी किंवा तालुकास्तरीय सरकारी योजनांतर्गत मोफत चाचणी कॅम्प आयोजित केले जातात.

मृदा तपासणी अहवालात काय माहिती मिळू शकते ?

 

तपशील

अर्थ

pH

मातीची आम्लता / क्षारता

EC (विद्युत चालकता)

क्षारांचे प्रमाण

सेंद्रिय कर्ब %

जमिनीतील सेंद्रिय घटक

N, P, K

नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण

सूक्ष्म अन्नद्रव्ये

झिंक, गंधक, लोह, बोरॉन

प्रत्येक घटकासाठी “अत्यल्प”, “मध्यम”, “उच्च” असे श्रेणी मध्ये वर्गीकरण  केलेले असते.

अहवालावर आधारित खत व्यवस्थापन –

मृदा तपासणी अहवाल आल्यानंतर तो अहवाल पाहून कृषी सहाय्यक किंवा कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  खतांचे अचूक प्रमाण व वेळ ठरवता येते, जे उत्पादन वाढवण्यास शेतकऱ्यांना फार मदत करते.

निष्कर्ष

मृदा परीक्षण हे शेतकऱ्यांच्या  फायद्यासाठी अत्यावश्यक पाऊल आहे. फक्त अंदाजाने खते न वापरता, विज्ञानाधारित पद्धती वापरल्यास उत्पादन खर्च कमी होतो आणि पीक गुणवत्ता वाढते आणि शेतीची सुपीकता टिकून राहते.

माती-मृदा-तपासणी
Scroll to Top