
शेतीत योग्य वेळेवर आणि हवामानाचे अंदाज घेऊन पेरणी करणे हे उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही ठरवते.
२०२५ हे वर्षदेखील याला अपवाद नाही. सध्य परिस्तिथीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग चा विचार करता, हवामान बदल, मान्सूनचा कालावधी आणि जमिनीची तयारी – हे सगळे घटक लक्षात घेऊन योग्य महिन्याची निवड करणे आवश्यक आहे आणि तितकेच फायदेमंद ठरेल.
२०२५ मध्ये मान्सूनची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, २०२५ मध्ये मान्सून साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रिय होईल. त्यामुळे पेरणीचे नियोजन त्या आधारे करणे शहाणपणाचे ठरेल.
महिन्यानुसार पेरणीची वेळ
जून (मध्यम पर्जन्य भागासाठी)
- योग्य वेळ: १० जून ते ३० जून
- पिके: सोयाबीन, मका, उडीद, मुग
मान्सून वेळेवर आल्यास वरील पिकांसाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.
जुलै (उशिरा पावसासाठी भाग)
- योग्य वेळ: १ जुलै ते १५ जुलै
- पिके: बाजरी, तूर, नाचणी
पाऊस उशिरा सुरु झाल्यास वरील पिकांसाठी ही पेरणी वेळ उपयुक्त ठरते.
ऑगस्ट (उशिरा खरीप पेरणी / आंतरपिके)
- योग्य वेळ: १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
- पिके: काही सत्रांमध्ये तूर, भुईमूग
जर शेतकऱ्यांनी वारिक पपिकांची पेरणी केली असल्यास आणि पाऊस वेळेनुसार न झाल्यास किंवा केवळ उशिरा पावसामुळे आधीची पेरणी न झाल्यास वरील पिकांचा विचार करावा.
काही महत्वाचे मुद्दे
पेरणीपूर्व जमिनीची तयारी: एक सारखी नांगरणी व योग्य वेळेवर पेरणी केल्यास उत्पादन चांगले मिळते.
बियाण्यांची निवड: वेळेवर व हवामानाशी सुसंगत बियाण्यांचा वापर करा.
हवामानाचा अंदाज घ्या: स्थानिक हवामान केंद्राची मदत घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य तो निर्णय घ्यावा.
शाश्वत शेतीचा अवलंब करा: ड्रिप सिंचन, आंतरपिके, जैविक खतांचा वापर करा.
तात्पर्य
२०२५ मध्ये पेरणीची योग्य वेळ जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असू शकते.
मात्र स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि पिकांची निवड यानुसार निर्णय घ्यावा. वेळेवर पेरणी केल्यास उत्पादनात २०–२५% पर्यंत वाढ होऊ शकते.