ContentSproute

शेती व घरगुती सौर ऊर्जा निर्मितीसाठी शासनाकडून विविध योजना (Various schemes from the government for agricultural and domestic solar energy generation)

शेती व घरगुती सौर ऊर्जा निर्मितीसाठी शासनाकडून विविध योजना

भारत हा उष्णकटिबंधीय देश असून इथे साधारणतः वर्षभर (जून आणि जुलै महिना वगळता) भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश हा उपलब्ध असतो. या मुळेच सौर ऊर्जा ही स्वच्छ, अक्षय (कधीही न संपणारी), आणि परवडणारी पर्यायात्मक व पर्यावरणपूरक अशी ऊर्जा ठरते. याच गोष्टींचा विचार करून त्याचा फायदा घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध सौर ऊर्जा योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

आपण या ब्लॉगमध्ये अश्याच काही योजनांविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे घेऊया.

  • सौर ऊर्जेचे फायदे
  • केंद्र शासनाच्या सौर ऊर्जा योजना –
      1. प्रधानमंत्री कुसुम योजना (PM-KUSUM)
      2. सौर छप्पर योजना (Solar Rooftop Scheme)
  • महाराष्ट्र शासनाच्या योजना –
      1. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana)
      2. घरगुती सौर छप्पर योजना – महाराष्ट्र
  • Net Metering म्हणजे काय?
  • सौर अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

सौर ऊर्जेचे फायदे

  • विजेच्या बिलात 90 ते १००% पर्यंत पूर्ण बचत
  • 25 वर्ष टिकणारी आधुनिक सोलर पॅनल प्रणाली
  • लोडशेडिंगपासून पूर्णपणे मुक्ती
  • प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक
  • शासनाकडून सबसिडी मिळाल्यामुळे परवडणारी किंमत
  • सोलर पॅनल बसविल्यामुळे घराच्या किंमतीमध्ये वाढ
  • Net  Metering द्वारे अतिरिक्त उत्पन

केंद्र शासनाच्या सौर ऊर्जा योजना

१. प्रधानमंत्री कुसुम योजना (PM-KUSUM)

(PM-KUSUM – Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan )

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:

  • शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित ३ HP ते ७.५ HP पंप बसवून देणे.
  • पारंपरिक डिझेल आणि विजेवरील पंप काढून त्याचे सौर ऊर्जे मध्ये रूपांतर करणे.
  • शेतकऱ्यांना जास्तीची वीज विकून (Net Metering द्वारे) अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे.
  • हरित ऊर्जा (Green Energy) वाढवणे आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाला साहाय्य करणे.

योजनेचे तीन प्रमुख घटक:

  • Component A – Grid Connected Solar Plant-
      1. 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल बसवून ऊर्जा निर्माण करणे.
      2. निर्माण केलेली ऊर्जा स्थानिक विजेच्या grid ला विकता येते.
  • Component B – जुन्या Agriculture Pumps चे सौर ऊर्जेमध्ये रूपांतर करणे-
      1. पारंपरिक विजेवर चालणारे पंप काढून त्याठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावणे.
      2. शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये बचत करणे.
  • Component C – नवीन सौर कृषी पंप बसवणे-
      1. पूर्णपणे नवीन सौर पंपांची बसवणे – 3HP ते 7.5HP पर्यंत.
      2. ही योजना विशेषतः जिथे वीज नाही अश्या ग्रामीण भागा मध्ये लागू केली आहे.

अनुदान (सबसिडी) कशी मिळते –

  • शेतकऱ्यांना संपूर्ण खर्चाच्या 60% खर्च हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळतो
  • उर्वरित 30% रक्कम हि बँकेकडून मुदत कर्ज स्वरूपात मिळू शकते
  • आणि राहिलेली फक्त 10% खर्च शेतकऱ्यांना स्वतःकडून करावा लागतो

अर्ज प्रक्रिया:

  • या योजनेसाठी शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन आपली माहिती भरून अर्ज करावा.
  • केंद्र सरकार: https://mnre.gov.in/
  • महाराष्ट्र राज्यासाठी: https://www.mahadiscom.in/solar/

२. सौर छप्पर योजना (Solar Rooftop Scheme)

ही योजना केंद्र सरकारच्या MNRE (Ministry of New and Renewable Energy) अंतर्गत राबवली जातआहे.

या योजने अंतर्गत घराच्या किंवा इमारतीच्या छतावर (Roof Top) सौर पॅनल चा सेटअप बसवला जातो. या सौर पॅनल दिवस भरामध्ये वीज निर्माण करतात आणि तीच वीज घरामध्ये वापरली जाते. निर्माण केलेली  वीज आणि तीच  वीज वापरून जर उरलेली असेल तर ती उरलेली वीज grid ला विकता येते, ज्याला Net Metering म्हणतात.

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:

  • सौर ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन देऊन वीज निर्मिती करणे
  • विजेवरील खर्चात बचत करणे
  • पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती
  • घरगुती/कार्यालय/संस्था यांना विजेचे स्वयंपूर्ण स्रोत उपलब्ध करून देणे

अनुदान सबसिडी:

श्रेणी

अनुदान

घरगुती वापरासाठी (1kW – 3kW)

40% पर्यंत सबसिडी

3kW ते 10kW

पहिल्या 3kW वर 40%, पुढील 7kW साठी 20%

10kW पेक्षा जास्त

सबसिडी लागू नाही

अर्ज प्रक्रिया:

या योजनेसाठी शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन आपली माहिती भरून अर्ज करावा.

https://solarrooftop.gov.in/ (केंद्र सरकारचे अधिकृत पोर्टल)

किंवा राज्य वितरण कंपनी (DISCOM) – महाराष्ट्रात Mahadiscom/MSEB

https://www.mahadiscom.in/solar-rooftop/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

१. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana)

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:

लाभार्थी

अल्पभूधारक व मध्यम शेतकरी

ऊर्जा स्रोत

100% सौर ऊर्जा (बिजेपासून स्वतंत्र)

पंप क्षमतेनुसार पर्याय

3 HP, 5 HP, 7.5 HP

अनुदान

95% पर्यंत अनुदान (शेतकऱ्याचा फक्त 5% वाटा)

योजनेसाठी पात्रता:

  • अर्जदार शेतकऱ्याजवळ स्वतःची शेती असावी
  • शेतीसाठी पाण्याचा स्रोत (कूप/बोअरवेल/नदी) असावा
  • शेतकऱ्याजवळ 7/12 उतारा असावा
  • विजेचे कनेक्शन नसलेल्या ठिकाणी विशेष प्राधान्य
  • सौर पंप योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा

अर्ज प्रक्रिया:

शेतकऱ्याने https://www.mahadiscom.in/solar/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा

२. घरगुती सौर छप्पर योजना – महाराष्ट्र

या योजने अंतर्गत घराच्या किंवा इमारतीच्या छतावर (Roof Top) सौर पॅनल चा सेटअप बसवला जातो. या सौर पॅनल दिवस भरामध्ये वीज निर्माण करतात आणि तीच वीज घरामध्ये वापरली जाते.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात –

  • स्वतः घराचे मालक
  • निवासी इमारती (फ्लॅट्ससाठी ग्रुप सोलर प्रकल्प)
  • समाजमंडळ, शाळा, हॉस्पिटल्स
  • ज्यांच्याकडे 100 sq.ft पेक्षा जास्त छप्पर जागा उपलब्ध आहे

अनुदान किती मिळू शकते –

सोलर युनिट क्षमता

अनुदान दर (%)

जास्तीत जास्त सबसिडी

1 – 3 kW

40%

₹60,000 पर्यंत

3 – 10 kW

पहिल्या 3 kW साठी 40%, पुढील साठी 20%

₹1,17,000 पर्यंत

10 kW पेक्षा जास्त

अनुदान नाही

अर्ज भरण्यासाठी प्रोसेस

Online Registration:

  1. https://solarrooftop.gov.in/ या MNRE च्या पोर्टलवर नोंदणी
  2. राज्य निवडून महावितरण किंवा अधिकृत DISCOM चे पोर्टल उघडा
  3. तुमच्या घराची माहिती, सौर क्षमतेची माहिती द्या
  4. अधिकृत सोलर वेंडरची निवड करा
  5. सर्वेक्षण आणि पॅनल इन्स्टॉलेशन
  6. Net Meter बसवणे
  7. तपासणी आणि सबसिडी मंजूर

Net Metering म्हणजे नक्की काय?

  • Net Metering ही एक दुहेरी वीज मीटर प्रणाली आहे.
  • दिवसा सौर पॅनल वीज तयार करतात – घरात वापरलेली वीज कापली जाते.
  • अतिरिक्त वीज MSEB grid ला परत पाठवता येते.
  • त्या बदल्यात तुम्हाला पुढच्या बिलांमध्ये सवलत किंवा पैसे मिळतात.

सौर अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा (शेतकऱ्यांसाठी)
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • फोटो
  • डिस्कॉम किंवा महावितरणचे ग्राहक क्रमांक (Rooftop साठी)
Scroll to Top