ContentSproute

हायड्रोपोनिक्सद्वारे पिकवता येणाऱ्या टॉप ५ भाज्या – एक आधुनिक कृषिपद्धती ( Top 5 Vegetables You Can Grow Using Hydroponics)

मातीशिवाय शेतीचा नवा पर्याय!

Vegetables

“मातीशिवाय शेती?” – काय? हो मातीशिवाय शेती ! हे ऐकून नवल वाटलं ना? पण आधुनिक काळात ही संकल्पना यशस्वीरित्या बऱ्याच ठिकाणी वापरली   जात  आहे.

या पद्धतीला म्हणतात हायड्रोपोनिक्स (Hydroponics) शेती  – ज्यात पाण्यामध्ये शेतीसाठी आवश्यक असणारे असे पोषणद्रव्य मिसळून झाडे पूर्णपणे पाण्यातच वाढवली जातात.

या नवीन पद्धतीच्या शेतीसाठी पाणी, अन्नद्रव्ये, नियंत्रित तापमान, हवा असणारा प्रकाश व योग्य हवामानाच्या व्यवस्थापनामुळे कमीत कमी जागेत, जलद व गुणवत्तापूर्ण उत्पादन सहज शक्य होते.

चला तर मग आपण या लेखात हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवता येणाऱ्या अश्या टॉप ५ भाज्यांची माहिती घेऊया –

हायड्रोपोनिक शेती केल्याने होणारे महत्वाचे फायदे

  • या शेती साठी मातीची मातीची काहीच गरज नाही
  • कीटकनाशकांचा वापर खूपच कमी
  • पाण्यामध्ये ८०–९०% पर्यंत बचत
  • शुद्ध असे व रासायनिक खताविरहित भाज्यांचे उत्पादन जे आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी
  • या शेतीसाठी जमीनच पाहिजे असे मुळीच नाही, आपण शहरी भागातही या शेतीचे उत्पन्न घेऊ शकतो (Terrace/Indoor)
  • जलद वाढ आणि जास्त उत्पादन या शेतीद्वारे सहज मिळवता येते

हायड्रोपोनिक्स शेतीसाठी सर्वाधिक योग्य अश्या टॉप ५ भाज्या

1. लेट्युस (Lettuce)

लेट्युस (Lettuce)

या भाजीचा उपयोग सर्वाधीक सॅलड बनवण्यामध्ये केला जातो. घरामध्ये किंवा हॉटेल मध्ये हि भाजी खूप प्रमाणात वापरली जाते.

हैड्रोफोनिकस साठी हि भाजी का निवडावी?

  • हि भाजी हलक्या पानांची असते
  • या भाजीचे उत्पादन फक्त ३०-४५ दिवसामध्ये घेता येऊ शकते
  • या भाजीची वाढ कमी तापमानामध्ये हि खूप चांगली होते
  • हॉटेल, सलाड बारमध्ये या भाजीची खूप मोठी मागणी

या भाजीचे काहि प्रकार ज्याचा विचार आपण या हैड्रोफोनिकस शेतीसाठी केला जाऊ शकतो –

  • बटरहेड, रोमेन, आयसबर्ग

टिप:

  • Deep Water Culture (DWC) किंवा NFT प्रणाली सर्वाधिक उपयुक्त

2. पालक (Spinach)

 विविध पोषणमूल्यांनी भरलेली अशी पालेभाजी म्हणजे पालक. 

पालक या भाजीची निवड का करावी?

  • पालकची भाजी म्हणजे लोह, कॅल्शियम आणि फायबरचा उत्तम स्रोत
  • साधारणतः हि भाजी ३५–४५ दिवसा मध्ये पूर्णपणे खाण्यासाठी तयार होते
  • हिवाळ्यातही या भाजीची चांगली वाढ होते
  • किचन गार्डनसाठी सुद्धा या भाजीची निवड आपण करू शकतो

पद्धत:

  • NFT (Nutrient Film Technique) या प्रणालीचा वापर केला  जातो.
  • pH ची मर्यादा ६.०–७.० ठेवणे खूपच उपयुक्त राहील

3. टॉमेटो (Tomato)

Tomatoes

टोमॅटोचा वापर आपण आपल्या दैनंदन जीवनामध्ये बऱ्याच भाज्यामध्ये करतो. म्हणूनच या भाजीची गरज व मागणी लक्ष्यात घेता टोमॅटो ची शेती हायड्रोपोनिक्स मधून करणे हे खूप फायदेशीर आहे

का निवडावि ?

  • टोमॅटो ची लागवड आपणाला वर्षभरंधे कधीही करता येते.
  • हायड्रोपोनिक द्वारे उत्पादन केलेले टॉमेटो हे रासायनिक खत न वापरता केल्यामुळे आरोग्यासाठी चांगली व जास्ती टिकाऊ असते.
  • मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येऊ शकते

पद्धत:

  • Cocopeat + Drip Irrigation (Substrate Culture)
  • Grow Bag मध्ये टोमॅटो उगवता येऊ शकतो
  • TDS ची रेंज साधारणतः २०००–३५०० ppm ठेवावी

4. काकडी (Cucumber)

काकडी (Cucumber)

कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे काकडी.

काकडीचे फायदे:

  • ५०–७० दिवसामध्ये उत्पादन
  • काकडीची वाढ जलद होते
  • ग्रीनहाऊसमध्ये काकडीचे उत्तम परिणाम दिसतात
  • बाजारभाव मध्ये चांगला भाव मिळून जास्ती नफा मिळू शकतो

पद्धत:

  • Dutch Bucket प्रणालीचा वापर करून काकडीचे उत्पनान घेता येऊ शकते
  • pH ची लेवल साधारणतः ५.८–६.२ ठेवावी
  • दर १५ दिवसांनी काकडीची कापणी करता येऊ शकते

5. मेथी (Fenugreek)

Fenugreek (Methi)

वैशिष्ट्ये:

  • आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त
  • मेथीची भाजी फक्त २५ ते ३० दिवस मध्ये पूर्ण तयार होते
  • भरपूर असे पोषणतत्व युक्त अशी भाजी
  • घरच्या इनडोअर मधेही सहज सेटअप उभा करता येऊ शकते

कोणती पद्धत वापरावी ?

  • Kratky Method (सोप्या पद्धतीने वीजविरहित)
  • कंटेनरमध्ये पाणी भरून व योग्य ती पोषकतत्त्व मिसळून मेथीची सहज लागवड करावी

लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये घ्यावयाची काळजी/महत्वाच्या टिप्स -

  • TDS (Total Dissolved Solids): पोषकतत्त्वांचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवणे
  • pH मोजणी: बहुतेक भाज्यांसाठी pH ५.५ ते ६.५ ठेवावे
  • घरामध्ये (इनडोअर ) जर आपण हैड्रोफोनिकस शेती केली असल्यास प्रकाशासाठी LED grow lights वापरणे फायदेशीर ठरू शकते
  • योग्य त्या प्रमाणात Temperature & Humidity ठेवणे खूपच गरजेचे असते
  • Water Change: दर ७–१० दिवसा नंतर पोषकतत्त्वांचे पाणी बदलत राहावे जेणेकरुन भाजी/पिकांसाठी लागणारे पोषक ची कमतरता भासणार नाही

हायड्रोपोनिक शेतीमधील संभाव्यता

  • शहरी भागामध्ये घेता येऊ शकते अशी शेती (Urban Farming): घराच्या बाल्कनी, गच्ची, किंवा बंद खोली मधेही सहज घेता येऊ शकते
  • कमर्शियल प्रोजेक्ट: बार, हॉटेल, सुपरमार्केट, जिम(Gym) साठी थेट पुरवठा करता येऊ शकतो
  • नफा: योग्य ते व्यवस्थापन केल्यास पारंपरिक शेतीपेक्षा २–३ पट उत्पन्न घेणे शक्य आहे
  • पर्यावरणपूरक: पाण्याची बचत व कोणतेही रासायनिक खत न वापरता या शेतीचे उत्पन्न घेता येते

थोडक्यात पण महत्वाचे

आज बऱ्याच देशामध्ये हैड्रोफोनिकस ची शेती घेतली जात आहे. हायड्रोपोनिक शेती म्हणजे आधुनिक काळातील एक शाश्वत, पर्यावरणस्नेही आणि अत्यंत फायदेशीर ठरणारी अशी शेतीपद्धती आहे.

पालक, लेट्युस, टोमॅटो, काकडी आणि मेथी या भाज्या सोप्या व्यवस्थापनाने, कमीत कमी  जागेत आणि जलद वेळेत पिकवून जास्तीत नफा घेता येतो.

हैड्रोफोनिक  पद्धत हि  केवळ व्यावसायिकांसाठीच नव्हे, तर घरच्या घरी आपल्या सर्वांसाठी ताज्या, रासायनिक खतविरहित भाज्यांचे उत्पादन करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग आपण करू शकतो.

Scroll to Top