ContentSproute

Uncategorized

गहू पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

गहू हे पीक रब्बी हंगामातील एक प्रमुख आणि पोषणमूल्यांनी भरलेले असे पीक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये (जसे की सांगली, सातारा, सोलापूर, पुणे) गहू मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गहू पिकासाठी योग्य लागवडीचा कालावधी – गहू हे पीक रब्बी हंगामातील पीक असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या पिकाची लागवड करणे जास्ती फायदेशीर ठरते. उशिरा लागवड केल्यास उत्पादनात घट येऊ शकतो आणि रोगांचा प्रादुर्भाव हि वाढण्याची शक्यता असते. योग्य वाणांची निवड गहू पिकासाठी योग्य तो वाण निवडणे तितकेच महत्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो खालील वाणाचा विचार शेतकऱ्यांनी करावे – वाणाचे नाव वैशिष्ट्ये HD-2189 कोरडवाहू क्षेत्रांसाठी योग्य MACS 6478 कमी कालावधीचे व जास्त उत्पादन NIAW-301 (Trimbak) प्रतिकारशक्ती असलेले, लवकर तयार होणारे HI 1544 (Purna) चांगल्या गुणवत्तेचे व पीक नियमित उत्पन्न देणारे शेत जमिनीची पूर्व तयारी व मशागत – मध्यम ते भारी काळी जमीन गहूसाठी योग्य मानली जाते. शेतीत एक खोल नांगरणी करावी व नंतर 2-3 कुळवाच्या फेऱ्या घ्याव्या. शेवटी पाटा फिरवून जमीन समतल करावि. पाणी व्यवस्थापन (सिंचन) – पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाण्याची टंचाई भासू शकते म्हणूनच  पाण्याचे योग्य नियोजन  करणे खूप आवश्यक आहे            टप्पा सिंचनाची गरज उगम टप्पा लागवडीनंतर 3–5 दिवसांनी फुलोरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा दाणे भरण्याचा टप्पा अधिक उत्पादनासाठी आवश्यक एकूण सिंचन 4–6 वेळा पुरेसे (हवामानावर अवलंबून) खत व्यवस्थापन मातीची तपासणी करून योग्य ती खते खाली नमूद केल्याप्रमाणे द्यावी – युरीया (नायट्रोजन): 100 किग्र/हेक्टरी सिंगल सुपर फॉस्फेट (फॉस्फरस): 50 किग्र/हेक्टरी म्युरेट ऑफ पोटाश (पोटॅश): 25 किग्र/हेक्टरी निम्मे नायट्रोजन लागवडीवेळी व उरलेले 25-30 दिवसांनी द्यावे कीड व रोग नियंत्रण सामान्य रोग: तांबेरा (Rust): पाने पिवळी किंवा नारिंगी रंगाची होतात कवकजन्य रोग: फफूंदी व मुळे कुजणे उपाय: Trichoderma सारख्या जैविक औषधांचा वापर Propiconazole 0.1% फवारणी करावी तांबेरासाठी वेळेवर गवत नियंत्रण (Weeding) करा तण नियंत्रण Pendimethalin (30% EC) हे तणनाशक पेरणीनंतर लगेच फवारावे 2,4-D हे पेरणीनंतर 30–35 दिवसांनी वापरावे (तण वाढल्यावर) कापणी व साठवणूक गव्हाची दाणे 20% आर्द्रतेवर कापणी करावी धान्य छान सुकवून 10–12% आर्द्रतेवर साठवून ठेवावे धान्य गोणीमध्ये भरून कोरड्या व हवेशीर जागेत ठेवा विशेष टिप्स (पश्चिम महाराष्ट्रासाठी): पाणी टंचाईच्या भागात ड्रिप सिंचन किंवा मल्चिंग चा वापर करावा योग्य वाण, खत, हवामान सल्ल्यासाठी शेती सहकार्य संस्था/कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क ठेवा गव्हासोबत डाळिंब/बदाम/केळीच्या आंतरपीकाचा पर्याय सुद्धा शेतकरी विचारात घेऊ शकता  (उत्पन्न वाढीसाठी) निष्कर्ष – गहू पिकाची लागवड योग्य वेळी, योग्य वाण, संतुलित खत व्यवस्थापन, सिंचन नियोजन आणि कीडनियंत्रण यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळवू शकतो.

गहू पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी Read More »

GM(Genetically Modified) शेती म्हणजे काय? फायदे आणि तोटे

आजच्या आधुनिक युगात शेतीमध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे GM शेती – म्हणजेच जिनेटिकली मॉडिफाइड (Genetically Modified) शेती. GM शेती म्हणजे काय? GM शेती म्हणजे अशा प्रकारची शेती जिथे पिकांच्या जनुकांमध्ये (DNA) वैज्ञानिक पद्धतीने बदल करून त्यामध्ये नव्या गुणधर्मांची वाढ केली जाते. आणि याचाच उपयोग म्हणजे  त्या पिकांना रोगप्रतिकारक, किडनाशक-प्रतिरोधक, कमी पाण्यात टिकणारे आणि जास्त उत्पादन देणारे बनवतात याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेऊ.  GM शेतीमुळे होणारे  फायदे –  उत्पादन क्षमतेमध्ये वाढ  किडींपासून संरक्षण (उदा. BT कापूस) रासायनिक खतांचा कमी वापर  व कीटकनाशकांची गरज कोरडवाहू भागात शेती करणे शक्य होते  उच्च पोषणमूल्य असलेले अन्नधान्य (उदा. Golden Rice) GM शेतीमुळे होणारे नुकसान –  जैवविविधतेला धोका आरोग्यावर परिणामाची शक्यता (अद्याप सुस्पष्ट पुरावे नाहीत) बियाण्यांवर कंपन्यांचे नियंत्रण  जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होण्याचा धोका परदेशांमध्ये GM पद्धतीने घेतली जाणारी प्रमुख पिके –  पिकांचे नाव देश मका अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, फिलिपाईन्स सोयाबीन अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना कापूस अमेरिका, भारत, चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया तांदूळ (Rice – Golden Rice) फिलिपाईन्स (मान्यता दिलेली), बांगलादेश (चाचणी टप्प्यात) पपई (Papaya) USA, चीन बटाटा (Potato) अमेरिका, कॅनडा टोमॅटो (Tomato) अमेरिका (1990 च्या दशकात), फिलिपाईन्स भारतात GM शेती कुठे होते? भारतामध्ये BT कापूस हे एकमेव अधिकृत GM पीक असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. BT कापसामुळे या राज्यांमध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि उत्पन्नात क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात GM शेतीचा वापर कुठे केलेला आहे ? महाराष्ट्रामध्ये मुख्यतः BT कापूस हे पीक खालील भागामध्ये होत आहे –  विदर्भ: अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशीम – येथे कोरडवाहू शेती असून BT कापूस फायदेशीर ठरतो. मराठवाडा: परभणी, नांदेड, लातूर – किडप्रदूर्भाव रोखण्यासाठी GM तंत्राचा वापर वाढलेला आहे. उत्तर महाराष्ट्र: जळगाव, धुळे, नंदुरबार – येथेही कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि GM वाण वापरले जातात. कायद्यानुसार भारतामध्ये कोणत्या पिकाला परवानगी आहे? सध्या भारतात केवळ BT Cotton ला परवानगी आहे. अन्नधान्यांसाठी GM वाण वापरण्यास अजून मान्यता नाही (Golden Rice अजून चाचणी टप्प्यात आहे). तात्पर्य GM शेती ही एक आधुनिक पद्धत आहे जी कमी पावसात, जास्त किडींमध्ये आणि जास्त उत्पादन हवे असल्यास फायदेशीर ठरते. मात्र तिच्या वापराबाबत शास्त्रीय निरीक्षण आणि योग्य मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.

GM(Genetically Modified) शेती म्हणजे काय? फायदे आणि तोटे Read More »

२०२५ साली पेरणी कधी करावी? – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माहिती

शेतीत योग्य वेळेवर आणि हवामानाचे अंदाज घेऊन पेरणी करणे हे उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही ठरवते. २०२५ हे वर्षदेखील याला अपवाद नाही. सध्य परिस्तिथीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग चा विचार करता, हवामान बदल, मान्सूनचा कालावधी आणि जमिनीची तयारी – हे सगळे घटक लक्षात घेऊन योग्य महिन्याची निवड करणे आवश्यक आहे आणि तितकेच फायदेमंद ठरेल. २०२५ मध्ये मान्सूनची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, २०२५ मध्ये मान्सून साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रिय होईल. त्यामुळे पेरणीचे नियोजन त्या आधारे करणे शहाणपणाचे ठरेल. महिन्यानुसार पेरणीची वेळ जून (मध्यम पर्जन्य भागासाठी) योग्य वेळ: १० जून ते ३० जून पिके: सोयाबीन, मका, उडीद, मुग मान्सून वेळेवर आल्यास वरील पिकांसाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. जुलै (उशिरा पावसासाठी भाग) योग्य वेळ: १ जुलै ते १५ जुलै पिके: बाजरी, तूर, नाचणी पाऊस उशिरा सुरु झाल्यास वरील पिकांसाठी ही पेरणी वेळ उपयुक्त ठरते. ऑगस्ट (उशिरा खरीप पेरणी / आंतरपिके) योग्य वेळ: १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पिके: काही सत्रांमध्ये तूर, भुईमूग जर शेतकऱ्यांनी वारिक पपिकांची पेरणी केली असल्यास आणि पाऊस वेळेनुसार न झाल्यास किंवा केवळ उशिरा पावसामुळे आधीची पेरणी न झाल्यास वरील पिकांचा विचार करावा. काही महत्वाचे मुद्दे पेरणीपूर्व जमिनीची तयारी: एक सारखी नांगरणी व योग्य वेळेवर पेरणी केल्यास उत्पादन चांगले मिळते. बियाण्यांची निवड: वेळेवर व हवामानाशी सुसंगत बियाण्यांचा वापर करा. हवामानाचा अंदाज घ्या: स्थानिक हवामान केंद्राची मदत घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य तो निर्णय घ्यावा. शाश्वत शेतीचा अवलंब करा: ड्रिप सिंचन, आंतरपिके, जैविक खतांचा वापर करा. तात्पर्य २०२५ मध्ये पेरणीची योग्य वेळ जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असू शकते. मात्र स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि पिकांची निवड यानुसार निर्णय घ्यावा. वेळेवर पेरणी केल्यास उत्पादनात २०-२५% पर्यंत वाढ होऊ शकते.

२०२५ साली पेरणी कधी करावी? – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माहिती Read More »

The FAIR Package Manager Just Launched as a WordPress Repository Alternative – but What Exactly Is It?

A few days ago, the annual WordCamp Europe meetup took place in the picturesque city of Basel, Switzerland. The biggest announcement from the event was the new FAIR Package Manager – but what exactly is it? In this article we dive into the details, including Matt Mullenweg’s reaction when asked about it on stage.

The FAIR Package Manager Just Launched as a WordPress Repository Alternative – but What Exactly Is It? Read More »

I Tried Hostinger’s New Horizons AI Developer Tool: Is the Hype Justified?

Hostinger Horizons is marketed as an easy way for non-developers without a technical background to build their own apps, but it can also be used to build websites. I decided to try both and in this post I will share the results with you. I’ll also provide my overall thoughts on Hostinger Horizons’s strengths, limitations, and usefulness.

I Tried Hostinger’s New Horizons AI Developer Tool: Is the Hype Justified? Read More »

Win a Free Spot in Modern WordPress Fast Track

We believe everyone deserves access to quality WordPress development education, regardless of financial circumstances. That’s why we’re excited to announce that we’re giving away one free spot in our upcoming Modern WordPress Fast Track course to someone who couldn’t otherwise afford it. About the Course Modern WordPress Fast Track is a 10-week course that will… Read More »Win a Free Spot in Modern WordPress Fast Track

Win a Free Spot in Modern WordPress Fast Track Read More »

Scroll to Top