आजच्या आधुनिक युगात शेतीमध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे GM शेती – म्हणजेच जिनेटिकली मॉडिफाइड (Genetically Modified) शेती.

GM शेती म्हणजे काय?
GM शेती म्हणजे अशा प्रकारची शेती जिथे पिकांच्या जनुकांमध्ये (DNA) वैज्ञानिक पद्धतीने बदल करून त्यामध्ये नव्या गुणधर्मांची वाढ केली जाते. आणि याचाच उपयोग म्हणजे त्या पिकांना रोगप्रतिकारक, किडनाशक–प्रतिरोधक, कमी पाण्यात टिकणारे आणि जास्त उत्पादन देणारे बनवतात याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेऊ.
GM शेतीमुळे होणारे फायदे –
- उत्पादन क्षमतेमध्ये वाढ
- किडींपासून संरक्षण (उदा. BT कापूस)
- रासायनिक खतांचा कमी वापर व कीटकनाशकांची गरज
- कोरडवाहू भागात शेती करणे शक्य होते
- उच्च पोषणमूल्य असलेले अन्नधान्य (उदा. Golden Rice)
GM शेतीमुळे होणारे नुकसान –
- जैवविविधतेला धोका
- आरोग्यावर परिणामाची शक्यता (अद्याप सुस्पष्ट पुरावे नाहीत)
- बियाण्यांवर कंपन्यांचे नियंत्रण
- जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होण्याचा धोका
परदेशांमध्ये GM पद्धतीने घेतली जाणारी प्रमुख पिके –
पिकांचे नाव | देश |
मका | अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, फिलिपाईन्स |
सोयाबीन | अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना |
कापूस | अमेरिका, भारत, चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया |
तांदूळ (Rice – Golden Rice) | फिलिपाईन्स (मान्यता दिलेली), बांगलादेश (चाचणी टप्प्यात) |
पपई (Papaya) | USA, चीन |
बटाटा (Potato) | अमेरिका, कॅनडा |
टोमॅटो (Tomato) | अमेरिका (1990 च्या दशकात), फिलिपाईन्स |
भारतात GM शेती कुठे होते?
भारतामध्ये BT कापूस हे एकमेव अधिकृत GM पीक असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
BT कापसामुळे या राज्यांमध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आणि उत्पन्नात क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात GM शेतीचा वापर कुठे केलेला आहे ?
महाराष्ट्रामध्ये मुख्यतः BT कापूस हे पीक खालील भागामध्ये होत आहे –
- विदर्भ: अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशीम – येथे कोरडवाहू शेती असून BT कापूस फायदेशीर ठरतो.
- मराठवाडा: परभणी, नांदेड, लातूर – किडप्रदूर्भाव रोखण्यासाठी GM तंत्राचा वापर वाढलेला आहे.
- उत्तर महाराष्ट्र: जळगाव, धुळे, नंदुरबार – येथेही कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि GM वाण वापरले जातात.
कायद्यानुसार भारतामध्ये कोणत्या पिकाला परवानगी आहे?
सध्या भारतात केवळ BT Cotton ला परवानगी आहे.
अन्नधान्यांसाठी GM वाण वापरण्यास अजून मान्यता नाही (Golden Rice अजून चाचणी टप्प्यात आहे).
तात्पर्य
GM शेती ही एक आधुनिक पद्धत आहे जी कमी पावसात, जास्त किडींमध्ये आणि जास्त उत्पादन हवे असल्यास फायदेशीर ठरते. मात्र तिच्या वापराबाबत शास्त्रीय निरीक्षण आणि योग्य मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.